अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासन आता आणखी सतर्कतेने काम करत आहे. यासंदर्भात राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी अनेक सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता
राहुरी तालुक्यात संचारबंदी लागू आहे. कोणी बाहेरून आलेल्याची माहिती लपवू नये, तसेच कारवाई करताना स्थानिक पातळीवर कुचराई होता कामा नये. चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई करावी, असा आदेश तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिला.
दुकान व आस्थापना या काही अटी – शर्ती वर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. तथापि राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत या अटी व शर्तीचा नागरिक व दुकानदार यांचेकडून कडेकोट पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
राहुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घालुन दिलेल्या अटी व शर्तीचा १०० टक्के पालन करणे अत्यावश्यक आहे, असे तहसीलदार शेख यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews