पावसाळ्यात किडनीच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येते आणि यातील काही सर्वसामान्य समस्यांवर प्रकाश टाकला आहे. ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल इंगळे यांनी…
अक्युट किडनी इंज्युरी :
ही स्थिती मान्सूनच्या काळात सर्वत्र अधिक प्रमाणात आढळून येते, कारण या दिवसांत लोकांचा दूषित पाणी व अन्नाशी संपर्क येतो. याच्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, अतिसार वा डायरिया, डीहायड्रेशन आणि झोप आल्यासारखे वाटणे या तक्रारींचा समवेश होतो.
लेप्टोस्पायरोसिस :
बॅक्टेरिया संसर्गाचा एक प्रकार असलेला लेप्टोस्पायरोसिस हा आजार सर्वसाधारणपणे दूषित पाणी किंवा मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. लेप्टोस्पायरोसिसच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि उलट्या यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे किडनी निकामी होऊ शकते.
डेंग्यू :
डासांद्वारे फैलावणाऱ्या डेंग्यू या विषाणूजन्य आजारामुळे ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी किंवा अंगावर चट्टे उठणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही वेळेला डेंग्यू हेमरहेजिक तापामुळे किडनी खराब होऊ शकते.
टायफॉइड :
दूषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून पसरणारा हा एक बॅक्टेरियल संसर्ग आहे. टायफॉइड बॅक्टेरिया रक्तप्रवाहातून पसरतो, ज्यामुळे तो प्रचंड धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकतो. काही प्रकरणांमध्ये टायफॉइडमुळे किडनी निकामी होऊ शकते.
हे पावसाळी आजार झालेल्या व्यक्तींपैकी प्रत्येकालाच किडनीच्या समस्या जाणवत नाहीत ही महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवायला हवी. मात्र, आधीपासूनच किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकार यंत्रणा ही नाजूक बनलेली असते, ज्यामुळे अशा व्यक्तींना वरील पावसाळी आजारांची लागण झाली तर त्यांच्याबाबतीत किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता तुलनेने अधिक असते.
सीकेडीशी संबंधित काही पावसाळी आजार कोणते? ज्या स्थितीमध्ये किडन्यांची रक्तामधून अशुद्ध तत्त्वे फिल्टर करण्याची क्षमता नष्ट होते, अशा स्थितीला क्रॉनिक किडनी डिजिज किंवा सीकेडी असे म्हणतात आणि या समस्येमुळे व्यक्तीला हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. या स्थितीमध्ये रक्तातील विषद्रव्ये इतर अवयवांना आणि उतींना हानी पोहोचवू शकतात.
हानी पोहोचण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी
भरपूर द्रवपदार्थ घेतल्याने डीहायड्रेशनला प्रतिबंध करण्यास खूप मदत होऊ शकते.
साचलेल्या पाण्यात पोहणे किंवा असे पाणी पिणे टाळणे.
आपले हात साबण व पाण्याने वरचेवर धुणे.
अन्न व्यवस्थित शिजवणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण अन्नातही घातक बॅक्टेरियाला मारण्याची एक परिणामकारक पद्धत आहे.
तुम्ही औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सूचनांनुसार, ती घेण्याची काळजी घ्यायला हवी.
लसीकरणामुळे या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.