अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जावे यासाठी आरटीओ, वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. नागरिकांना नियमांचे महत्व समजावे हा या कारवाई मागे उद्देश असतो.
अशाच काही कारवाई मध्ये कोट्यवधींची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्या बेशिस्त वाहन चालकांवर डोळासणे महामार्ग पोलिसांनी स्पीडगन मशीनद्वारे धडक कारवाई केली आहे.
११ महिन्यांत तब्बल 20 हजार 175 वाहनांवर मोटार वाहन कायदा व त्यांचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. एक कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सदर कारवाईमध्ये 13 हजार 921 वाहनांवर अतिवेगाने वाहन चालविल्याने एक कोटी 39 लाख 21 रुपयांचा दंडासह 127 विना हेल्मेट दुचाकी स्वारांकडून 63 हजार 500 व वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्या 57 वाहन चालकांवर कारवाई करुन
त्यांचेकडूनही 11 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved