ओळखीचा फायदा घेत लॉजवर नेले आधी मारहाण केली मग जीवे मारण्याची धमकी दिली अन …

Pragati
Published:
atyachar

Ahmednagar News : एका अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या ओळखीचा फायदा घेत तिला गोड बोलून लॉजवर नेले तेथे गेल्यावर आधी मारहाण केली मग जीवे मारण्याची धमकी दिली अन मग अत्याचार केला. अशीच धमकी देत त्या मुलीला लॉजवर घेऊन जात तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा संशयित आरोपी चेतन संतोष सरोदे गांधीनगर, बोल्हेगाव) याच्याविरुध्द अत्याचार, मारहाण, धमकी पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने ३० जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलगी नगर शहरातील एका उपनगरात कुटुंबासह राहते व विद्यालयात शिक्षण घेते. तिची चेतन सरोदे सोबत ओळख झाली होती.

त्या ओळखीतून चेतन याने तिला २२ डिसेंबर २०२२ ते १० एप्रिल २०२४ या दरम्यान नगरमधील तीन विविध ठिकाणच्या लॉजवर नेले व तेथे तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

तिने विरोध केला असता तिला मारहाण देखील करण्यात आली. या प्रकाराबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आई व भावाला समजले असता चेतन याने त्यांना देखील जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पीडित मुलीने दि. ३० जून २०२४ रोजी एमआयडीसी पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला असून त्यानंतर फिर्याद दिली आहे . या प्रकरणी पोलिसांनी चेतन सरोदे विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.

दरम्यान,या घटनेतील पीडित मुलगी ही अल्पवयीन असून देखील हॉटेलमधील लॉजवर तिला प्रवेश दिला गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लॉज मालकांविरुध्द देखील पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe