वृद्धेच्या एकटेपणाचा फायदा घेत चोरटयांनी लाखो लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे .

नुकतेच शहरातील एका ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत घडलेली घटना अशी कि, शहरातील धर्माधिकारी मळ्यातील सुमन कॉलनीमध्ये गुरूवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरामध्ये त्यांच्या वृद्ध आई एकट्या होत्या.

यादरम्यान चोरटा फिर्यादी यांच्या घरामध्ये शिरला. घरात वृद्ध महिला असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने घरातील भिंतीला टांगून ठेवलेल्या कपाटाच्या चावीने कपाटाचे लॉक उघडले.

एक लाख रुपयाची रोख रक्कम, 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एक लाख 90 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. .

फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांना कपाट उघडे दिसले. कपाटातील दागिने व रोकड चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अरविंद कुमार लक्ष्मीनारायण सोमाणी (वय- विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24