अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतेच महापारेषण महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केले आहे.
जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या महावितरण महापारेषण बाबत अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. वाढत्या समस्या पाहता त्या सोडवण्यासाठी आमदार काळेंनी पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या या अडचणी तातडीने सोडवा अशा सूचना कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी महापारेषण महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावातील 25 के व्ही क्षमतेचे रोहित्र चोरीला गेलेले आहे, त्या ठिकाणी आज पर्यंत नवीन रोहित्र बसवले नाही.
त्या ठिकाणी तातडीने रोहित्र बसवा मतदारसंघात बरेच रोहित्र नादुरूस्त आहेत ते सर्व रोहित्र तातडीने दुरुस्त करा. कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील लांबलेल्या वीज वाहिन्या व वाकलेले
पोल तातडीने दुरुस्त करा आदीवासी वाडी योजने अंतर्गत मतदारसंघातील दिले जाणारे प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करावा. असे आदेश आमदार काळेंनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserveds