file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  देशात सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च कामगिरी करत खेळाडू देशासाठी पदके मिळवत आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी देखील सुवर्णकामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना संलग्न युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालय च्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदकांना गवसणी घातली आहे. विद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

नवनाथ बाचकर व धनेश माने अशी सुवर्णपदक पटकवणार्‍या खेळाडूंची नावे आहेत. या स्पर्धेत नवनाथ तानाजी बाचकर याने 17 वर्षे वयोगटात 800 मी धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित

सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तर धनेश पावसा माने याने 20वर्ष वयोगटात 1500 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक पटकावले. विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.