Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील सात केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने तलाठी परीक्षा प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे जबाबदारी आहे १७ ऑगस्टपासून सुरू झालेला हा परीक्षेचा कार्यक्रम १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्य शासनाचा कणा ही महसूल विभागाची ओळख आहे. महसूल विभागात सर्वात शेवटच्या स्तरावरील महत्त्वाचे असलेले पद म्हणजे तलाठी होय. शासनाच्या विविध योजनांची थेट गाव पातळीपर्यंत अंमलबजावणी करणारा घटक तसेच आवश्यक माहिती संकलनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी तलाठ्याकडे असते.
राज्यात मागील अनेक दिवसांपासून रिक्त झालेल्या तलाठी पदांची भरती प्रक्रिया प्रतिक्षेत होती. नगर जिल्ह्यात गावांची एकूण संख्या १ हजार ६१० आहे. या गावांसाठी पूर्वी ५८३ महसुली सजा होते. राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारकिर्दीत डिसेंबर २०२२ मध्ये जिल्ह्यासाठी २०२ महसुली सजा नव्याने वाढले.
त्यामुळे जिल्ह्यातील महसुली राजांची एकूण संख्या ७८५ झाली. जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्य या पदांप्रमाणे तलाठी उपलब्ध नव्हते तलाठ्यांची पदे रिक्त असल्या स्थानिक नागरिकांना कामाची हो तसेच प्रशासकीय कामे करतान होणारा विलंब या बाबी लक्षात घेऊ राज्यभरातील तलाठ्यांच्या रिक्त पदांच भरती प्रक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिं सरकारने घोषित केली.
यासाठी राज्या जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फ तलाठी पदभरतीसाठीची जाहिरा प्रसिद्ध करीत अर्ज मागविण्यात आले नगर जिल्ह्यातील २५४ रिक्त तला पदांसाठी विहित मुदतीत तब्बल ६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आता टीसीएस कंपनीमार्फत तला पदासाठी ऑनलाइन परीक्षा प्रक्रिय सुरू करण्यात आली आहे…
नग जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी सात कें निश्चित करण्यात आली आहेत. १ ऑगस्टपासून या केंद्रावर उमेदवारांच ऑनलाइन परीक्षा सुरु झाली आहे. २०० मार्काचा बहुपर्यायी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येकी एक पेपर आहे. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबपर्यंत निश्चित तारीखनिहाय परीक्षा पेपर होणार आहे. या परीक्षेचे समन्वय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे जबाबदारी आहे.