टॅलेंट ऑफ अहमदनगर 2020 चे आयोजन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, युनिव्हर्सल फाऊंडेशन, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली), जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, तसेच जिल्हाभरातील विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने सलग तिसर्‍या वर्षी टॅलेंट ऑफ अहमदनगर या सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.15 ऑक्टोबर पासून ते 15 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी ही स्पर्धा ऑनलाईन होणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य संयोजक सागर आलचेट्टी व आदिती उंडे यांनी केले आहे. कोरोनाचे सावट असल्याने सर्व शाळा व महाविद्यालय बंद आहेत.

विद्यार्थी घरातच बसून आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व कोरोनाच्या दडपणातून मुक्त होण्यासाठी तसेच आपले छंद जोपासण्याकरिता या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कोरोनापासून बचाव व विविध सामाजिक संदेश घेऊन जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन पध्दतीने नाट्य, गायन, वैयक्तिक नृत्य, वेशभुषा, लावणी आदि विविध स्पर्धेचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवतींना आपल्या कलेचे सादरीकरण करता येणार आहे. सदर स्पर्धा दोन वयोगटात घेतल्या जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे. यातून निवडलेल्या विजेत्यांना टॅलेंट ऑफ महाराष्ट्र 2021, तसेच लघुचित्रपट,

जाहिरात व दिल्ली येथे येणार्‍या टॅलेंट ऑफ इंडिया मध्ये संधी देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. टॅलेंट ऑफ अहमदनगर 2020 यशस्वितेसाठी अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, अ‍ॅड. गौरी सामलेटी, आरती शिंदे,

पोपट बनकर, शिवाजी खरात, रावसाहेब काळे, रजनी ताठे, भीमराव उल्हारे, आप्पासाहेब नरवडे, संध्या पावसे, संध्या देशमुख, नयना बनकर, शिवाजी नवले, अ‍ॅड. सुनिल तोडकर, तुषार रणनवरे, प्रताप काळे, गणेश टाळके, प्रा.सुनिल मतकर, गणेश ढोले, माया जाधव, प्राचार्य ज्योत्स्ना शिंदे, मनीषा म्हस्के, योगिता देवळालीकर,

अमोल बागुल, सचिन गुलदगड, रोहित गोसावी, सलीम सय्यद, मीनाताई म्हस्के, रवींद्र साळवे, विक्रम घुले, उषा कपिले, संजय साळवे, प्रसाद निदाने, दिपाली अडगटला, सुनील गायकवाड, संतोष उल्लारे, भीमाशंकर देशमुख, डॉ. कार्तिकी नांगरे, विद्या शिरसागर, विद्या तन्वर, जयश्री शिंदे,

प्रमिला घोडके, जयश्री कुलथे, भगवान चौरे आदि जिल्हाभरातील संस्थांचे प्रतिनिधी प्रयत्नशिल आहेत. टॅलेंट ऑफ अहमदनगर 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी स्पर्धकांना 8983984999 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24