अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यातच इच्छुक उमेदवारांसह नेतेमंडळी यांची एकच धावपळ सुरु आहे.
यातच गावागावातिलक राजकारणे, भावकीचा वाद, यामध्ये गावांचा विकास खुंटतो यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा हि मागणी काही पुढाऱ्यांनी केली आहे.
यासाठी विकासात्मक निधीचे आश्वासने देण्यात येत आहे. याच मुद्यावरून नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
राम शिंदे म्हणाले कि रोहित पवार ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत. मात्र,
असंच सुरु राहील तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार- खासदार होतील. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रलोभणं दाखवणं, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे या गोष्टी चुकीच्या आहेत.
मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तीस लाखांचं बक्षीस जाहीर करणं हे घटना विरोधी आहे. तसेच आमदार पवार यांच्यावर राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.