अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील 31 केंद्रावर रविवार (दि.21) रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थीनी परीक्षा सुरू होण्यापूवी 20 मिनीट आधीच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे,
असे आवाहन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले आहे. ही परीक्षा मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, कन्नड, तेलगू या भाषातून होणार आहे. टीईटीच्या परीक्षा दोन टप्प्यात पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक दोन अशा पध्दतीने होणार आहे.
यात पेपर एकसाठी 1 ते 30 आणि पेपर दोनासाठी 30 ते 61 असे परीक्षा केंद्र राहणार आहेत. पेपर एकसाठी 10 हजार 410 विद्यार्थी राहणार असून पेपर दोनसाठी 9 हजार 704 विद्यार्थी राहणार आहेत.
परीक्षा केंद्राबाहेर पोलीसांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली. दरम्यान रविवारी होणाऱ्या या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून
परीक्षेसाठी 15 झोन अधिकारी, 61 केंद्र संचालक, 61 सहायक परीरक्षक, पर्यवेक्षक (प्रति ब्लॉक मागे एक) असे 190 राहणार आहेत.
यासह समावेशकांची संख्या ही 843 राहणार असून लिपीकांची संख्या 122, परीक्षेसाठी 144 शिपाई यांची नेमणूक करण्यात येणार आहे.