शिक्षकांचे नेते माधव लांडगे यांचे अपघाती निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माधव लक्ष्मण लांडगे (वय 54) हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर घडली आहे

माधव लांडगे हे मोटारसायकलहून जात असताना कारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. माधव लक्ष्मण लांडगे हे मुळचे संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा येथील रहिवाशी होते. प्राथमिक शिक्षकांचे नेते होते.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे ते चेअरमन राहिले होते. सध्या अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते सेवा बजावत होते.

काल रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत मोटारसायकलहून जात असतांना हॉटेल कुणाल जवळ त्यांच्या मोटारसायकलला कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24