अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीने अवघ्या जगात थैमान घातले आहे.हळूहळू सरकारने लॉकडाऊनमधून जनतेला दिलासा देण्यासाठी अनलॉकबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
यामध्ये दिवाळी पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आले आहे तर सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक पातळीवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
शासनाच्या आदेशाने सोमवारपासून (ता.23) टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना मिळाल्या असल्या तरी शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण न झाल्याने आणि पालकही संमत नसल्याने संगमनेर शहरासह तालुक्यातील बर्याच शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे वास्तव चित्र पहायला मिळाले.
दरम्यान स्थानिक व्यवस्थापनाकडून नियोजन करण्यात आलेल्या काही शाळाही सुरू करण्यात आल्या, मात्र त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे.
यामध्ये संगमनेर शहरातील दि. ग. सराफ विद्यालय, भाऊसाहेब गुंजाळ पा.कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानमाता विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, ज्ञानमाता कॉन्व्हेंट स्कूल अशा सात शाळा सुरू होणार होत्या.
परंतु, प्रत्यक्षात तीनच शाळा सुरू झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी दिली. दरम्यान, प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी
अद्यापही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचेच यावरुन स्पष्ट होत आहे. तर अनेक शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांनीही शाळेकडे पाठ फिरविली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved