अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- राज्य शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यामुळे ५० हजार शिक्षकांवर व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.
या कायद्याच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली. मात्र शासनाला अद्याप जाग आलेली नाहीये. याचा निषेध म्हणून शासनाच्या अध्यादेशाची आज होळी करून निषेध व्यक्त केला.
संपूर्ण शिक्षकांमध्ये संताप वाढत असून, जर शासनाने त्वरित निर्णय बदलला नाहीतर संपूर्ण राज्यात अति तीव्र आंदोलन शिक्षक परिषद करणार आहे,
असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी दिला. जुनी पेंशन रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधीकाऱ्यांनी आज नगरमध्ये राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान येथे जिल्हास्तरीय एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाच्या अध्यादेशाची होळी केली.