अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- कर्जत शहराच्या कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून कर्जत कचरामुक्त करण्यासाठी आता आमदार रोहित पवारांनी चांगलीच शक्कल लढवली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी त्यांच्या संकल्पेतून सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.मध्यप्रदेशातील इंदौरच्या धर्तीवर या सॉफ्टवेअर प्रणालीची निर्मिती केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्यावर ही प्रणाली काम करणार आहे. आता शहरातील सर्व माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलित करण्यात येणार आहे.
रोज किती कचरा संकलित झाला,त्यातही ओला कचरा आणि सुका कचरा अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. कर्जत नगर पंचायतकडे कचरा व्यवस्थणासाठी एकुण ७ घंटागाड्या आहेत या गाड्यांचे रूट मॅपिंग होणार आहेत. त्या ठिकाणावर कलेक्शन सेंटर कायम करून या गाड्या तेथील कचरा संकलित करणार आहेत.
त्या प्रत्येक कचरा संकलन केंद्राला वॉटरप्रुफ क्यु आर कोड देण्यात येणार आहेत. गाडीत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे मोबाईल टॅबलेट असेल जो की तो क्यु आर कोड स्कॅन करेल आणि कचऱ्याबाबतची सर्व माहिती त्या टॅबमध्ये संकलित होईल. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्जत शहराचा क्रमांक येण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे.
आ.रोहित पवार हे आपल्या मतदारसंघात अनेक कल्पक योजना राबवत आहेत.त्यांची ही संकल्पना कर्जतच्या आरोग्यासाठी,सौंदर्यासाठी नक्कीच औत्सुक्याची ठरणार आहे.