अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-मतदान केंद्रावर उमेदवाराचे चिन्ह नारळ असताना व केंद्राध्यक्षांनी नारळ फोडण्यास मनाई करून देखील संबधीतांनी नारळ फोडला.
ही घटना पारनेर तालुक्यातील सुपा येथील पवारवाडीत घडली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन पहाणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असून प्रशासनाचे या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
सुपा येथील मतदान केंद्रावर महीला उमेदवाराचे चिन्ह नारळ असताना मतदान केंद्रावर सकाळी शुभारंभ करतेवेळी नारळ फोडले. यामध्ये एका महिलेसह इतर चार जणांनी नारळ फोडले.
असे करण्यास येथील केंद्राध्यक्षांनी याबाबत यांना मनाई केली, मात्र त्यांना न जुमानता नारळ फोडल्याने याबाबत तहसिलदार ज्योती देवरे यांना माहिती दिली.
त्यांनी त्वरित आपल्या फौजफाट्यासह मतदान केंद्रावर जात पाहणी केली असता त्यावेळी त्यांना नारळ तिथेच आढळून आले, त्यानंतर देवरे यांनी पोलिस प्रशासनाला संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.