अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील हंगा नदीपात्रात वाळूतस्करांनी मोठा उपद्रव चालवला आहे. अवैध वाळूची वाहतूक करत असून परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करत आहेत.
या अवैद्य वाळू तस्करांवर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत मुस्क्या आवळल्या आहेत. तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील हंगा नदीपात्र तसेच परिसरातील ओढ्यांमधून वाळूचा बेकायदा उपसा करणारांना चाप लावत तहसीलदार ज्योती देवरे यांनी वाळूची अवैध वाहतूक करणारा वाळूसह ट्रक पकडला आहे.
सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हंगा नदीपात्र तसेच विविध ओढ्यांमधून वाळूची तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे आल्या होत्या. यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु वाळूतस्कर शक्यतो रात्री किंवा पहाटे वाळूतस्करी करीत असल्यामुळे स्थानिक कर्मचार्यांना या तस्करीचा थांगपत्ता लागत नव्हता.
त्यामुळे बुधवारी पहाटे तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्वतःच पुढाकार घेत पाडळी रांजणगाव रस्त्यावर जाऊन वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केली. स्थानिक कर्मचार्यांना सोबत न घेता कोषागार अव्वल कारकून दत्ता गंधाडे यांना सोबत घेत तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही कारवाई केली आहे.
पाडळी रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करीत असताना कडूस येथे (एम.एच. 12 एम.व्ही. 4441) मालवाहू ट्रक त्यांना आढळून आला. वाळूवर ताडपत्री बांधलेली असल्याने ट्रकमध्ये नेमके काय आहे. याचा अंदाज येत नव्हता. ट्रकवरील ताडपत्री उघडून तपासणी केली असता वाळूची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
देवरे यांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले. तहसीलदार देवरे यांनी तालुक्यात लागोपाठ दोन ठिकाणी वाळू तस्करावर कारवाई केल्याने वाळू चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
वाळू चोर नुसतीच वाळू चोरून थांबत नाही तर ते रात्री अपरात्री ट्रंका नदीलगतच्या शेतांनी उभ्या पिकांनी घालतात वरून या तस्कराची दहशत खुप आसल्यामुळे गरिब शेतकरी कुठेही तक्रारही करत नाहीत. तहसीलदाराच्या आजच्या कारवाईने त्यांना थोडाफार प्रतिबंध होईल.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved