मंदिर बंद, तरीही विशाल गणपतीचे थेट दर्शन; लढवली ‘ही’ शक्कल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- सध्या राज्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी विविध पर्याय केले जात आहेत. त्या पैकीच एक म्हणजे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

सर्व मंदिरे मार्च महिन्यापासून बंद आहेत. मात्र असे असतानाही आणि मंदिर बंद असतानाही अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर येथे विशाल गणपतीचे थेट दर्शन भाविकांना घेता येत आहे तेही सर्व नियम पाळून.

गणेशभक्तांना गणरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काच लावण्यात आली आहे. यामुळे मंदिरात प्रवेश न करताही गणरायाचे दर्शन गणेशभक्तांना होऊ लागल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यंदा कोरोनामुळे येथे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मात्र गणेश उत्सव काळात तरी विशाल गणपतीचे मंदिर खुले करण्यात यावे, अशी मागणी काही गणेश भक्तांकडून होत होती.

या मागणीवर एक नामी उपाय ट्रस्टने अंमलात आणला आहे. जेणेकरून कोरोना अनुषंगाने करण्यात आलेली नियमावलीही पाळली जावी,

व गणेश भक्तांना मंदिराच्या बाहेरून का होईना पण गणरायांचे दर्शन व्हावे व एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळावे. त्यासाठीच ग्रामदैवत विशाल गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संपूर्ण काच बसवण्यात आली आहे.

तसेच या काचेसमोर बॅरिकेट्स लावण्यात आले आहे . त्यामुळे नियमानुसार गणेश भक्तांना मंदिरात प्रवेश मिळत जरी नसला तरी गणरायाचे मुखदर्शन त्यांना या काचेतून होऊ लागले आहे.

दर्शनाला येताना भाविकांनी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, आदी नियमावली भाविकांनी पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24