अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- महिलांवरील वाढते अत्याचार, त्यांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, व केंद्राने परवानगी देऊनही आघाडी सरकारने बंद ठेवलेली धार्मिक स्थळे याच्या निषेधार्थ श्रीगोंदा भाजपा च्या वतीने आ.श्री.बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शनी मंदिर, शनिचौक, श्रीगोंदा, येथे भजन करून लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये डॉ.सौ.प्रतिभाताई बबनराव पाचपुते, श्रीगोंदा भाजपा चे तालुकाध्यक्ष: संदीप नागवडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष: जयश्री कोथिंबीरे, प्रतिभा झिटे, सुवर्णा पाचपुते, वैजयंती लगड, बेबीताई मगर, संस्कृती अडागळे, उपनगराध्यक्ष: रमेश लाढाणे, नगरसेवक: बापुतात्या गोरे, अशोक खेंडके, संतोष खेतमाळीस, संतोष क्षिरसागर,सुनील वाळके,अंबादास औटी, संग्राम घोडके, नाना लांडे,
संतोष रायकर, दिपक हिरनावळे, अमोल शेलार, अमोल अनभुले, उमेश बोरुडे, रोहित गायकवाड, गणेश अडागळे, गोवर्धन नवले,विशाल कवडे, दत्ता दोरतले यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, संत व भाविक भक्त सहभागी झाले होते. यावेळी डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या कि, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार,विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. हिंगणघाट मधील तरुण प्राध्यापिकेला भर रस्त्यात पेटवून देण्यात आले.
रोहा येथील १४ वर्षाच्या चिमुरडीवर सामुहिक बलात्कार करून तिची ठेचून हत्या करण्यात आली. वसईतील मतीमंद मुलीवर झालेला अत्याचार असो कि चालत्या रेल्वेतील सामुहिक बलात्कार, अशा मनाला वेदना देणाऱ्या असंख्य घटना घडत असताना निष्क्रिय प्रशासन व संवेदनशुन्य शासन मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. अशा वेळी भाजपा महिला मोर्च्या च्या माध्यामातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल अनेक वेळा निवेदन पाठवले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही.
यावरून हे सरकार महिला सुरक्षेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. त्या पुढे म्हणाल्या कि, राज्यात बार सुरु आणि मंदिर बंद अशी परिस्थिती आहे. मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरा भोवती असणारे छोटे छोटे व्यावसायिक जसे कि फुलवाला, चहावाला, रिक्षावाला,हातगाडीवाला, हॉटेल व्यावसायिक अशा अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी सरकारने योग्य ती खबरदारी घेऊन गुन्हेगारांवर त्वरित कठोरातील कठोर कारवाई करावी.
व सर्व धार्मिक स्थळे भाविक भक्तांना दर्शनासाठी ताबडतोब खुली करावीत. आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ. पाचपुते यांनी दिला. तहसीलच्या वतीने नायब तहसीलदार योगिता ढोले यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved