अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगर शहरात टेम्पोचालकास लुटले ! ‘त्या’ ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सारसनगरजवळील कर्पे विटभट्टीजवळ टेम्पोचालकास मारहाण करत लुटल्याची घटना ३० ऑक्टोबरला घडली. या प्रकरणी अफताब नवाब बागवान यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९५, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अविनाश विश्वनाथ जायभाये, सुमित साळवे, ऋषिकेश बडे, मुनीर सय्यद व इतर दोघांचा समावेश आहे. याबाबत फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,

फिर्यादी अब बागवान हे त्यांचा मालवाहू टेम्पो (क्र. एमएच १६, सीडी १६५७) घेवून गोडावूनकडे जात होते. सोबत भाचा अरबाज बागवान हेही होते. सारसनगरजवळील कर्पे विटभट्टीजवळ आरोपी १ अविनाश जायभाये याने पाण्याची बाटली पिण्यासाठी मागितली असता,

आमच्याकडे बाटली नाही’, असे सांगण्यात आले. याचा राग धरत अविनाश जायभाये याने फिर्यादीच्या तोंडावर लोखंडी फाईट मारली. तद्नंतर इतरांनी फिर्यादी व त्याचा भाचा यास लाकडी दांडक्याने मारहाण केली.

गाडीतील २ लाख २५ हजाराची रोकड, पाकिट व डॅश बोर्डवर ठेवलेला मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्याचप्रमाणे गाडीवर दगड मारुन मोठे नुकसान केले. पुढील तपास पोनि. चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसई. मोरे हे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office