अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : संगमनेर माझ्याकडे चांगल्या स्कीम आहेत. त्यात पैसे गुंतवल्यास दामदुप्पट फायदा होईल, असे आमिष दाखवून मालदाड रोड येथे राहणाऱ्या सचिन कानवडे या तरुणास १० लाखांचा गंडा घातला गेला.
या संदर्भात शहर पोलिसांनी चिखली येथील नितीन रावसाहेब हासे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नितीनने मालदाड रोड येथे राहणारा सचिन माधवराव कानवडे या तरुणाशी जवळीक साधली.
मी एसआरएस ट्रेड कंपनीत मोठ्या पदावर काम करतो. माझ्याकडे चांगल्या स्कीम आहेत. त्यात पैसे गुंतवले, तर दामदुप्पट फायदा होईल,
असे आमिष दाखवून ऑगस्ट व सप्टेंबर २०१७ मध्ये त्याने सचिनला १० लाख १२ हजार ५०० रुपयांना गंडा घातला. तीन वर्षे होऊनही पैसे मिळाले नाहीत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews