Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात नरभक्षक बिबट्याची दहशत ! दहा बारा पिंजरे, भुलीची इंजेक्शने तरीही हाती लागेना..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर हा काही नवीन प्रकार राहिला नाही. अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा कहर त्याची दहशत पाहायला मिळत आहे. दरम्यान आता संगमेनर तालुक्यातील लोणी गावात नरभक्षक बिबट्याने दहशत माजवली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये याची दहशत पसरली आहे. वनविभागाकडून या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दहा बारा पिंजरे, भुलीची इंजेक्शने सर्व काही करूनही बिबट्या काही हाताला लागेना अशी स्थिती आहे. सहा दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरू असूनही तो चकवा देत असल्याने नागरिक भीतीग्रस्त आहेत.

लोणी गावात बिबट्याने मुलावर हल्ला केल्यानंतर या हल्ल्यात तो मृत्यू पावल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरु केले. या परिसरात तब्बल १२ पिंजरे लावले असून तो हाती न लागल्याने शेवटी भुलीचं इंजेक्शन मारण्यात आले होते. हे करूनही तो काही हाती लागेना. सध्या वन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

लोणी परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्याचे लोक सांगतात. बिबट्याने शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना घडली. यात तो मुलगा ठार झाला. लोणी परीसरात त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले होते. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच गावातील ही घटना असल्याने याची चर्चा झाली. संक्रातीच्या पूर्वसंध्येलाच रविवारी (१४ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली होती.

अथर्व असे या मृत मुलाचे नाव असून तो घराजवळच खेळत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला ओढत नेले होते. मुलगा सापडत नसल्याने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह शेतात सापडला होता. घटना समजताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्या पकडण्यास सुरवात केली होती. त्याला अद्याप यश आले नाही.

मागील काही दिवसापासून बिबट्याचा परीसरात मुक्त संचार असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. वेळीच बिबट्याला जेरबंद केले असते तर अनेक अनर्थ टळले असते असे लोक म्हणतात. दरम्यान सध्या गावात नरभक्षक बिबट्याची दहशत असून त्याला पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे.