New Mahindra Thar Launch Date : कार घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. विशेषतः थारप्रेमींसाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की देशातील लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा एक मोठा धमाका करणार आहे. या चालू वर्षात कंपनी आपली लोकप्रिय कार थारचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
कंपनीच्या माध्यमातून आपली बहुचर्चीत आणि बहुप्रत्यक्षित 5-Door Thar कार लवकरच लॉन्च होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. ही गाडी 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत अगदी सुरुवातीलाच बाजारात येऊ शकते असा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण ही गाडी नेमकी कोणत्या महिन्यात लॉन्च होणार आणि या गाडीची किंमत काय राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केव्हा लॉन्च होणार 5-Door Thar
मीडिया रिपोर्टनुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी 5-Door Thar कारचे जून महिन्यात प्रोडक्शन सुरू करणार आहे. जून महिन्यात प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात केव्हाही या गाडीची लॉन्चिंग होऊ शकणार आहे. या अपकमिंग गाडीमध्ये कंपनीच्या नवीनतम इंटरफेससह नवीन 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, उच्च ट्रिम्सवर इलेक्ट्रिक सनरूफ, पुढील आणि मागील आर्मरेस्ट तसेच नवीन स्टीयरिंग व्हील यांचा समावेश राहणार आहे. या बहूप्रतीक्षित कारच्या डिझाईन मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
या कारच्या एक्सटेरियर डिझाईन मध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यात नवीन अलॉय व्हील सेट, टेल लॅम्पसह अद्ययावत फ्रंट ग्रिल उपलब्ध करून दिले जाणार असे वृत्त समोर आले आहे. ही 5-डोरची महिंद्रा थार 2.2-लिटर mHawk डिझेल आणि 2.0-लिटर mStallion पेट्रोल इंजिनसह सुसज्ज राहणार आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये बाजारात लॉन्च होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
याव्यतिरिक्त, 4-व्हील ड्राइव्ह सिस्टम संपूर्ण श्रेणीतील पॅकेजचा भाग असेल आणि महिंद्रा नवीन थार 5-डोअरसह रियर-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन देखील देऊ शकते, अशा चर्चा सध्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये पाहायला मिळत आहेत. या गाडीमध्ये सेफ्टी फीचर्स वर देखील विशेष लक्ष राहणार आहे.
या नव्याने लॉन्च होणाऱ्या कार मध्ये दोन एअर बॅग दिल्या जातील. तसेच या गाडीची किंमत पंधरा ते सोळा लाखांच्या घरात राहणार असा मोठा दावा देखील मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. निश्चितच जर तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची असेल तर आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करून ठेवावी लागणार आहे.