त्या पोलिस निरीक्षकांनी केले हे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- वाहतूक, पार्किंग, नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षाविषयक समस्या सोडवण्याच्या कामाला आपण प्राधान्य देणार आहोत. मात्र सध्या पोलिस बळ अत्यंत कमी असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.

त्यामुळे नागरिकांना पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.

शहरातील एका मंगल कार्यालयात व्यापारी आणि समाजसेवकांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गायकवाड बोलत होते. पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना काय अपेक्षा आहेत, याबद्दल त्यांनी नागरिक व जनतेची मते जाणून घेतली.

जामखेड तालुक्याचा विस्तार आणि शहराची लोकसंख्या पाहता पोलिस बळ अपुरे आहे. जोपर्यंत व्यापारी, नागरिक पुढे होऊन पोलिसांना मदत करत नाहीत, तोपर्यंत ठोस पावले उचलता येत नाहीत.

व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, पार्किंगबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले.या वेळी नगर परिषदेचे अधिकारी, नगरसेवक, व्यापारी व परिसरातील नागरिक या बैठकीस उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24