अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- शिर्डी नगरपंचायतने नव्याने बांधलेल्या नूतन अग्निशमन दलाच्या तसेच मुख्याधिकारी भवनाला स्व. लोकनेते पद्मभूषण खा. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक कार्यकर्ते गिरीष सोनेजी यांनी तसे निवेदन दिले आहे. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी ते निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक कार्यात वेगळा ठसा उमटवून गोरगरीब जनतेची प्रामाणिक सेवा केल्याने
लोणीसारख्या भागात स्व. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने सुरू असलेल्या साखर कारखान्यामार्फत तसेच वैद्यकीय क्षेत्रात गोरगरिबांची प्रामाणिक सेवा करण्याचे काम आजतागायत सुरू आहे.
त्यामुळे त्यांचे नाव शिर्डी नगरपंचायत मालकीच्या अग्निशमन संकुलाला देण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी या आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आणि गोरगरीबांच्या
विकासासाठी आणि शिक्षणाबद्दलचे योगदान असो किंवा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील यशासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो, त्यांचे कार्य पिढ्यांना प्रेरणा देईल, असे उद्घार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved