अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा कोरोना या संसर्गजन्य व भयानक विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला होता.
याचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्रशासनाने टाळेबंदी घोषीत केली होती. कोरोना बाधीत रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईक देखील घाबरत होते.
विषाणूबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आयुक्त म्हणून रुजू झालो त्यावेळी सर्व परिस्थिती नवीन होती. शहराची माहीती नव्हती, कर्मचाऱ्यांची माहिती नव्हती.
तरीही आम्ही सर्व अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी एकजुटीने परिस्थितीला दृढ निश्चयाने सामोरे गेलो. दैनंदीन स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आदी नित्य व अत्यावश्यक सेवा अखंडपणे सुरू ठेवली.