अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- जमिनीचा चुकीचा फेरफार रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या दाव्याच्या निकालपत्राच्या आदेशाची प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना महिला कर्मचाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली.
शैला राजेंद्र झांबरे (दुर्वांकूर, नित्यसेवा साेसायटी, सावेडी, नगर) असे या लाचखोर महिलेचे नाव आहे. श्रीगाेंदे-पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराने निकालाची प्रत मिळण्यासाठी अर्ज केला हाेता. ती देण्यासाठी लघुलेखक झांबरे (वय ५५) हिने दहा हजार रुपयांची लाच मागितली हाेती. त्यापैकी चार हजारांची लाच तिने आधीच घेतली हाेती.
उर्वरित रक्कम ती मागत हाेती. तक्रारदाराने याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्रीगोंदे येथील तहसील कार्यालयात सापळा रचून झांबरे हिला तीन हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.