अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- जामखेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, पुणे जिल्ह्यातील लोणंद, सासवड, वडगाव निंबाळकर, तसेच शिर्डी, बीड जिल्ह्यातील नेकनूर, अंबाजोगाई, आष्टी, शिवाजीनगर ,
शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यांमध्ये चोरी घरफोडी, दरोडा, खून अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल असलेली अट्टल दरोडेखोरांची टोळी शिंगणापूर पोलिसांनी कांगोणी शिवारातून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना गुप्त माहिती मिळाली, नगर- औरंगाबाद महामार्गावर शिंगणापूर फाट्याजवळ चांद्याकडे जाणाऱ्या रोडवर कांगोणी शिवारात पाच ते सहाजन संशयितरित्या बसलेले आहेत,
या माहितीवरून कर्पे यांनी छापा टाकून तिघेजन जेरबंद केले. मात्र काहीजण अंधार व काटवणाचा फायदा घेत पळून गेले. अमोल जालिंदर काळे (वय २६, रा. राजेवाडी, ता. जामखेड),
खंडू ऊर्फ किरण रावसाहेब काळे (वय २५,रा) . मिलिंदनगर, ता. जामखेड), विकी मिलिंद घायतडक (वय ३१, रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींकडून लाल रंगाची सुझुकी मोटरारसायकल (क्रमांक एमएच १२ एटी ३९६९), चाकू, लाल मिरचीची पूड, लोखंडी गज अशा वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.