‘त्या’तरुणीने दिला बाळाला जन्म, लग्नाचे आमिष दाखवून नराधमाने केला होता बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यातील खांडगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला मी तुझ्याशी लग्न करीन असे खोटे आमिष दाखवून

तिला संत्र्याच्या शेतात नेवून तेथे तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला तसेच आरोपी अभिजीत भरत ससे याने त्याच्या घरी नेवूनही सदर तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला.

ऑक्टोबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान वेळोवेळी अत्याचाराचा हा प्रकार घडला. त्यातून २६ वर्षांची तरुणीला दिवस गेले. ती गर्भवती राहिली व नुकताच तिने एका बाळाला जन्मही दिला.

तेव्हा पिडीत तरुणीने आरोपी अभिजीत भरत ससे रा.खांडगाव, ता. पाथर्डी याला त्याच्या घरी जावुन सांगितले की, तृ माझ्याशी लग्न कर, तेव्हा अभिजित ससे म्हणाला की, तुला व तुझ्या बाळाला जिवंत मारुन टाकील.

मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तू खालच्या जातीची आहे, असे म्हणून शिवीगाळ करुन जातीवाचक बोलून तुला काय करायचे ते करुन घे, तुझा खून करील, अशी धमकी दिली.

२४.१२.२०२० रोजी हा प्रकार घडला. काल पिडीत तरुणीने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी अभिजीत भरत ससे याच्याविरुद्ध अँट्रेसिटींचा गुन्हा दाखल करण्यात आला, डिवायएपपी मुंढे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24