अहमदनगर बातम्या

Ahmednagar News Today : ज्ञानेश्वरीचे पारायण करतानाच ‘त्या’ माऊलीने घेतला अखेरचा श्वास …!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News Today : जन्म झालेल्या जीवाचा मृत्यू अटळ असतो. मात्र तो कसा व्हायला हवा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीच्या हातात असते. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला आपल्याला मरण आले तरी शत्रूशी लढताना वीरमरण यावे.

अशी भावना असते. तशीच काहीशी त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्याची देखील भावना असते. अशीच घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. कीर्तन, प्रवचन, भजन करत सतत अध्यात्मिक सेवेत रममान असणाऱ्या

एका माऊलीचा ज्ञानेश्वरीचे पारायण करताना मृत्यू झाला. ही घटना दुःखद आहे मात्र देवाच्या सेवेत असताना मृत्यू येणे हा देखिल नशिबच म्हणावे लागेल.

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सुंदरबाई शामराव बिडवे यांचे नुकतेच निधन झाले. त्या ८३ वर्षाच्या होत्या. पिंपळगाव माळवी या त्यांच्या गावात हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनांनंतर त्यांच्यावर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अखेरच्या दिवशी सकाळी त्या नित्यनेमाने ज्ञानेश्वरी पारायण करत होत्या, ते करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. नगर येथील डॉ. ना.ज. पाअुलबुधे विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक व शिक्षण क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Ahmednagarlive24 Office