अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- शिक्षणाची गंगेचा झरा घराघरापर्यंत पोहचविणारे गुरुजी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवत असतात. मात्र नगर जिल्ह्यात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अश्लील शिक्षकाची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
शाळेच्या विद्यार्थींनी सोबत अश्लील चाळे करणारा गुरूजी संतोष एकनाथ माघाडे (वय 34, रा. गंगापूर जि. औरंगाबाद) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या
शाळेमध्ये माघाडे गुरुजी हा ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींना शाळेत बोलावून घेत असे व त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली.
विद्यार्थिनीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाच ते सहा अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडला आहे.
सोमवारी माघाडे विरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.