अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील कुकाण्यापाठोपाठ रविवारी भेंडे शिवारातही कोरोनाचा रग्ण आढळला. भेंड्यातील तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला.
हा तरुण कुकाणे येथे असला तरी तो भेंडे शिवारात वस्तीवर राहतो. हा रुग्ण नेवासे फाट्यावरील रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे तोही बाधित झाला.
या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब रविवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले. कुकाण्यातील कालच्या १४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यात एका खासगी डॉक्टरचाही समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com