अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील 65 वर्षीय व्यक्तीने अवघ्या सहा तासात चाकण ते चिंभळे अंतर सायकलवरून पार केले आहे. घरी जायच्या ओढीने त्याने ही किमया केली.
हा व्यक्ती पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. चिंभळे येथील हा जेष्ठ व्यक्ती बारा वर्षे झाली पुणे परिसरात मिळेल ते काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ही व्यक्ती आकुर्डी येथील कंपनी व हौसिंग सोसायटी यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कोरोनाचा प्रभाव वाढल्याने त्यांना घरी येण्याचे निरोप जात होते मात्र महिना पूर्ण न झाल्याने पगार मिळणार नाही या भीतीने ते तेथेच राहिले.
काही दिवसांपूर्वी ते चाकणला आले . गावाकडे शेती, कुटुंब असते. लॉक डाऊन मध्ये पुणे परिसरात कोरोना वाढत असल्याने घरच्यांना आठवण झाली आणि त्यांनी सायकलवर टांग मारली. सहा तासात जवळपास 100 किलोमीटर अंतर गाठले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®