अहमदनगर बातम्या

‘त्या’ खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  खंडणीच्या गुन्ह्यात दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या अकोले पोलिसांनी आवळल्या. मयूर सुभाष कानवडे (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यास ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Ahmednagar Crime)

अकोल्यातील बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून ३० लाख रूपयांच्या खंडणी प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारीस आरोपी गणेश भागुजी कानवडे,

मयूर सुभाष कानवडे यांच्यासह आणखीन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. यात गणेश कानवडे यास पोलिसांनी अटक केली. मात्र मयूर कानवडे हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला.

तो तब्बल १० महिन्यांनंतर पोलीसांकडून अटक करण्यात आला. मंगळवारी (२८ डिसेंबर) रात्री १० वाजल्यानंतर संगमनेर येथून त्यास ताब्यात घेतले.

बुधवारी (२९ डिसेंबर) त्यास अकोले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी मयूर कानवडेचा संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर २५ जून रोजी तो फेटाळण्यात आला.

तेव्हापासून अकोले पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर अकोले पोलिसांनी त्यास सापळा रचून संगमनेर येथून मंगळवारी ताब्यात घेतले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office