खुनाच्या प्रकरणातील आरोपी पुण्यातून पळाला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- शिर्डीतील एका खून प्रकरणातील आरोपीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हाच आरोपी आज सकाळच्या सुमारास पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

समीर अक्रम शेख (रा. शिर्डी) असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शिर्डी येथील एका खून प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीत झालेल्या एका खून प्रकरणात पोलिसांनी समीर शेख याला अटक केली होती. समीर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. खून प्रकरणात तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता.

काही दिवसांपूर्वी त्याने कोठडीत असतानाच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन कर्मचारीही उपस्थित होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्याने देखरेखीसाठी ठेवलेल्या पोलिसांची नजर चुकवून पळ काढला. पोलिसांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24