अहमदनगर बातम्या

आरोपींना पोलिसांनी शहरातून पायी फिरवले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहरातून पायी फिरवले आहे.

महाविद्यालय व विद्यालय परिसरात आरोपींना पायी फिरवल्याने गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसणार आहे.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या १६ पैकी १० अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना गजाआड करून मित्रांना व नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.

काल सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकाने अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील ५ आरोपिना देवळाली प्रवरा शहरातून व राहुरी फॅक्टरीत महाविद्यालय व शाळा परिसरात फिरवले.

यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील,

सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू आहेर, सहायक पोलिस उपनिरीक्षक फुलारी, हनुमंत आव्हाड, विकास साळवे, खेमनर, अमित राठोड, सम्राट गायकवाड, लिपणे यांच्यासह होमगार्ड जवान उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office