13 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीना राहत्या घरातून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  मागील 13 वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यात पसार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे.

यामध्ये अदिक्या उर्फ आदेश अदिक, शिवटीन्या काळे (वय 45 रा. देऊळगाव गलांडे ता. श्रीगोंदा), प्रकाश दत्तू गोलवड (वय 40 रा. भिंगाण ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अदिक्या काळे याच्याविरूद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर प्रकाश गोलवड विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दंग्याचा गुन्हा दाखल होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघे आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनेक वर्षांपासून पसार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यान गुप्त माहितीद्वारा मार्फत माहिती मिळाली कि, आरोपी त्यांच्या राहत्याघरी आले असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस पथकाने आरोपींना अटक केली आहे. पुढील तपासकामी आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24