हापमर्डर करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-हापमर्डर करून फरार झालेल्या आरोपीला नगर पोलिसांनी नंदूरबारमध्ये जाऊन अटक केली आहे. विशाल अशोक कोते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीत गाजलेल्या सागर शेजवळ खून खटल्यात कोते हा आरोपी आहे. २०१५ पासून तो जेलमध्ये होता. करोना रजेवर तो बाहेर आला होता.

या काळात त्याने राजेंद्र लालजीभाई भंडेरी यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. डिसेंबर २०२० मध्ये ही घटना घडली होती.

हा गुन्हा केल्यानंतर कोते हा पसार होता. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलीस त्याला शोधत होते. कोते हा धुळे जिल्ह्यातील शिरापूर येथे असल्याची माहिती एलसीबीचे पीआय अनिल कटके यांना मिळाली.

कटके यांनी एपीआय मिथून घुगे यांना त्याला पकडण्याचे आदेश देत सोबत पोलीस पथक दिले. पोलीस धुळ्यात पोहचले त्यावेळी तो तेथून शहादा व पुढे नंदूरबारकडे गेल्याचे समजले. पोलीस नंदूरबार येथे पोहचले,

त्यावेळी तो नंदूरबार-मुंबई बसमधून गेल्याचे कळाले. पोलीस पथकाने या बसचा पाठलाग करून पिंपळनेर येथे बस अडविली. बसमधून कोते यास ताब्यात घेत एलसीबी पोलिसांनी त्याला अटक केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24