कार्यकर्त्‍यांनीच शेतक-यांशी थेट संवाद साधुन विधेयकातील तरतुदींबाबत शंकाचे निरसन करावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्‍या कृषि विधेयकांच्‍या संदर्भात कार्यकर्त्‍यांनीच शेतक-यांशी थेट संवाद साधुन विधेयकातील तरतुदींबाबत शंकाचे निरसन करावे, बाजार समितीच्‍या माध्‍यमातून यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याची माहीती माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

माजी पंतप्रधान स्‍व.अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतक-यांशी व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संवाद साधला.

शहरातील जिल्‍हा सहकारी बॅंकेच्‍या सभागृहात या रॅलीमध्‍ये तालुक्‍यातील विविध संस्‍थाच्‍या पदाधिकारी आणि कार्य‍कर्त्‍यांनी सहभाग नोंदविला.

याप्रसंगी भाजपाचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष अॅड.रघुनाथ बोठे, गणेश कारखान्‍याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, माजी नगराध्‍यक्ष सोपानराव सदाफळ, भाजपाचे शहर अध्‍यक्ष अनिल बोठे,

राजेंद्र वाबळे, अॅड.तेजस सदाफळ, डॉ.के.वाय गाडेकर, सचिन मेहेत्रे, ज्ञानेश्‍वर गाडेकर, नगरसेवक सलिम शहा आदि याप्रसंगी उपस्थित होते.

या संदर्भात माहीती देताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, कृषि विधेयकाच्‍या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून सर्वच शंकाचे निरसन केले आहे.

गावपातळीवर आता कार्यकर्त्‍यांनी कृषि विधेयकाच्‍या संदर्भात शेतक-यांशी थेट संवाद साधुन या विधेकातील तरतुदींबाबतची माहीती देण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा,

कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या माध्‍यमातून लवकरच परिसंवादाचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24