या ग्रामपंचायतींचा कारभार गेला प्रशासकांच्या हाती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे. यामुळे तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी महेश डोके यांनी २३ ऑगस्ट रोजी काढले आहेत. नियुक्ती केलेल्या सर्व अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतचा कारभार आता २० प्रशासकांच्या हाती आला आहे.

प्रशासकांना सरपंचांचे सर्वाधिक अधिकार देण्यात आले आहेत. कारभार करताना गैरवर्तन, कसूर केल्यास कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24