अहमदनगर बातम्या

धाक दाखवून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडता येणार नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सरकारला न्याय द्यावाच लागेल. कर्मचाऱ्यांच्या लढ्यासमोर सरकारला शेवटी झुकावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांचे संघटन, एकी हेच आंदोलनाचे यश आहे.(ST Workers Strike)

धमक्या-धाक दाखवून मेस्मा कायदा लादून व निलंबित करुन आंदोलन चिरडता येणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला. दरेकर यांनी शनिवारी संगमनेर बस स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली.

या प्रसंगी ते बोलत होते. नंदू कानकाटे, इम्रान पठाण, पोपट शिंदे, विजय देशमुख, गणेश गोसावी, विलास चौधरी, तोसिफ शेख, रामदास लेंडे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांनी उगाचच संप पुकारला नाही. पगार किती मिळतो, हातात किती पडतात. याची कल्पना आहे. कर्जाचे व्याजावर व्याज, घर कसे चालवावे हे चित्र महाराष्ट्रभर आहे.

खर तर सरकारला भावना नाही. सरकारने चार पावले मागे यावे. चर्चेची तयारी ठेवावी. चर्चेतून मार्ग निघेल. त्या अनुषंगाने सरकाराने वाटचाल करावी.

दबावतंत्र वापरुन कर्मचाऱ्यांना दाबता येणार नाही. जर आंदोलनाने दिशा वेगळी घेतली तर सरकार त्याला जबाबदार राहणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office