अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेवर सख्ख्या दिरानेच बलात्कार केला. याबाबत पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, पिडीत महिला ही कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथे पती व मुलगा यांच्याबरोबर राहते. गुरूवारी रात्री ७.३० वाजता पती हे रानात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते.
त्यावेळी पीडिता एकटीच घरात स्वयंपाक काम करत होती. दरम्यान पीडितेचा दिर रफीक हा घरात आला व पीडितेला म्हणाला की, विहिरीवरील मोटार का चालू केली.
तसेच तू सतत मोटार चालू करते. तू काय माझी बायको आहे का? असे म्हणत पीडितेला खाली पाडून तिचे तोंड दाबून बळजबरीने अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
घडलेली घटना पीडितेने तिचे पती, मुलगा आणि फलटण येथील जावई यांना सांगितली. यानंतर पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे अधिक तपास करीत आहेत.