पालिकेतील 60 कामगारांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात अनेकांना आपला रोजगार, नौकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. यामुळे अनेक जण अद्यापही घरी बसून आहे.

मात्र आता श्रीरामपूर पालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 60 कामगारांना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार संबंधित विभागांच्या प्रमुखांनी अचानक कामावरून काढले.

या निर्णयामुळे कामगार संघटना आक्रमक झाली आहे. काढलेल्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आल्याने, कामगार संघटनेतर्फे जीवन सुरुडे यांनी निषेध व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला.

पालिकेतील पाणीपुरवठा, अतिक्रमण, वसुली, बांधकाम, वीज विभागांतील कंत्राटी कामगारांनी अनेक वर्षे तुटपुंज्या वेतनावर सेवा केली. कोरोना संकटातही पालिकेने त्यांच्याकडून नियमित कामे करवून घेतली.

त्याची दखल घेऊन कामगारांचे वेतन वाढविणे गरजेचे असताना, मुख्याधिकारी ढेरे यांनी त्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याचा आरोप सुरुडे यांनी केला.

या कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना कमी करताना मुख्याधिकाऱ्यांनी कामगार संघटनेसह पालिकेतील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. अशा एकतर्फी व कामगारविरोधी निर्णयाचा कामगारांनी निषेध केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24