महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्‍या बंदला ग्रामीण भागात कोणताच प्रतिसाद मिळाला नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- एकीकडे उत्‍तर प्रदेश मधील घटनेचे राजकीय भांडवल करून राज्यातील जनतेला वेठीस धरणा-या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटात कोणतीही मदत केली नाही.

त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात संतापाची भावना आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्‍या बंदला ग्रामीण भागात कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

महसुल मंत्री थोरातांचेच जोर्वे गावातही व्‍यवहार सुरळीत सुरु असल्‍याचे उपसरपंच गोकुळ दिघे यांनी सांगितले. कोव्हीड कारणाने प्रशासनाने बंद केलेली

गावे वगळता महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदला आश्वी आणि परीसरातील गावांना प्रतिसाद दिलेला नाही. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जोर्वे गाव सुध्दा बंदमध्ये सहभागी झाले

नसल्याचे दिसून आले. तालुक्यातील कोल्हेवाडी, उंबरी, ओझर बुद्रुक, कनोली, आश्वी, शिबलापूर, पानोडी, पिंप्रीलौकी, शेडगाव ही गावे कोव्हीड कारणाने प्रशासनाने यापुर्वीच बंद केलेली आहेत.

मात्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावासह रहीमपूर, चिंचपूर, कनोली, कनकापूर, ओझर खुर्द, झरेकाठी या गावांमध्ये बंदला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या गावातील सर्व दैनदीन व्यवहार सुरळीतपणे सुरु असल्याचे पाहायला मिळाले.