अहमदनगर बातम्या

चोरीच्या गुन्ह्यातील दोन पसार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहाता परिसरात मोटारसायकलस्वारास लूटमार करणरे दोघे जेरबंद करण्यात आले आहे.

प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता) व सचिन कल्याणराव गिधे (रा. समर्थनगर, कन्नड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

सतीश शंकर पूरम (रा. शिर्डी) हे व त्यांचा मुलगा साईसुशांत हे त्यांचे दुकान बंद करून शिर्डी ते साकुरी रोडवरून घरी जात होते. या दरम्यान तीन अनोळखी इसमांनी त्यांची लूटमार केली.

गळ्यातील सोन्याची चेन, रोख रक्कम असा एकूण १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली होती.

या प्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात प्रमोद हरी लोखंडे यास अटक करण्यात आली होती.

मात्र त्याचे दोन साथीदार पसार होते. ते सुपा, एमआयडीसी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांना पकडण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींना राहाता पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओल्ला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर,

पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office