अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई ! कत्तलखान्यांमधून पोलिसांनी १ कोटी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरात सूरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती.

या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास ६२ लाख रुपयांच्या ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि २) संगमनेर शहरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरु झालेली कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरु होती.

या कारवाई दरम्यान कत्तलखान्यांच्या परिसरात वारंवार तणावही निर्माण होत होता. मात्र, पोलिसांनी त्याला न जुमानता जमाव पांगवला व आपली कारवाई सुरुच ठेवली.

सहाय्यक फौजदार रफियोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसांनी वाहीद कुरेशी, मुद्दसर हाजी, नवाज कुरेशी, जहिर अवर कुरेशी, परवेज कुरेशी, कलीम सलीम खान, अबीदुरहक अब्दुलजबर या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.