अहमदनगर बातम्या

अहमदनगर करांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील युवक व नागरिकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायिकांना स्वस्त व कमी वेळेत

अहमदनगर – पुणे प्रवास करता यावासाठी आज मी दौंड ते नगर हा रेल्वे प्रवास करून रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली असून पुढील पंधरा दिवसात सदर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन अहवाल सादर केला जाईल व लवकरच नगर ते पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी पाहणी दरम्यान दिली.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दौंड ते नगर रेल्वे प्रवास करून नगर रेल्वे स्थानकावर दाखल झाले असता यांचे स्वागत करताना नगरसेवक मनोज कोतकर,ॲड.धनंजय जाधव,

नगरसेवक राहुल कांबळे,रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हर्जितसिंह वाधवा,अशोक कानडे,अमित गटणे,सुरज कुरलीये आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office