अहमदनगर बातम्या

पिकविम्याबाबत सर्वात मोठी बातमी ! शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यावर येणार ‘इतके’ पैसे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : महायुती सरकारने सुरु केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना १ हजार १२९ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच सुरु होणार असून, आत्तापर्यंत २६४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने खरीप २०२३ पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

मध्यंतरी नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात आली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पीक कापणी प्रयोग आधारित एकूण ११२९.३७ कोटी इतकी नुकसानभरपाई मंजूर झालेली आहे. एक रुपयात पीक विमा योजना सुरु करणारे महाराष्ट्र देशात एकमेव राज्य आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका या योजनेच्या माध्यमातून सरकारची आहे.

२५ टक्के अग्रीम रक्कम दिल्यानंतर आता उर्वरित रक्कम मंजुर असून ती लवकरच उपलब्ध होईल अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तालुकानिहाय विमा रक्कम
अकोले ४७.३६७, संगमनेर १२८.९८, राहाता १२१.२२, श्रीरामपूर ६९.५६, नेवासा ८७.९४, कोपरगाव ७९.५९, राहुली १०३.३५, पाथर्डी ७५.६४, पारनेर १२३.०१, नगर ६५.५३, शेवगाव ९.७७, श्रीगोंदा ४८.७८, कर्जत ९३.८५, जामखेड ७४.५१ (कोटी)

Ahmednagarlive24 Office