महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात बर्ड फ्लूचे संकट घोंगावतय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-सध्या राज्यात करोनाबरोबरच बर्ड फ्लूने डोके वर काढले असून नगर जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आला असल्याची माहिती समोर येत आहे.

पाथर्डी तालुक्यानंतर राहुरी मध्ये बर्ड फ्लूने एंट्री केली होती यामुळे अनेक कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या. आता जिल्ह्यातील आणखी एका तालुक्यात बर्ड फ्लू ने प्रवेश केला आहे.

संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात करोना महामारीचे संकट संपत नाही तोच आता बर्ड फ्लू आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील शिंदोडी, ढोणवाडी येथे काही दिवसांपूर्वी कोंबड्या मरण पावल्या होत्या. या कोंबड्यांचे नमुने तपासण्यासाठी भोपाळ येथे पाठवण्यात आले होते.

या कार्यालयातून या कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मरण पावल्याचा अहवाल येताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. या रोगाचा प्रसार इतर ठिकाणी पसरू नये म्हणून या करिता प्रतिबंधक उपाय म्हणून शिंदोडी,

ढोणवाडी ता. संगमनेर येथील बाधित कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने किलींग करून विल्हेवाट लावण्याबाबत सूचना मिळताच सदर परिसरात आरोग्य विभागातील आपत्ती निवारण पथक कार्यरत अधिकारी पशुधन विकास अधिकारी नियंत्रण अधिकारी यांच्यासह पशुधन पर्यवेक्षक परीचय यांच्यासह सर्वच दल उपस्थित झाले.

परिसरातील बाधित कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्यात आली. जिल्हा अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन यांनी शिंदोडी गावातील एक किलो मीटर परिसर हा इन्फक्टेड झोन म्हणून घोषित केला आहे. उर्वरीत 10 किलोमिटरचा परिसर हा विशेष निगराणी झोन म्हणून घोषित केला आहे. या घटनेने साकूर भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24