अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-नगर जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात नेहमी बिबट्याचा वावर आढळून येत असत. मात्र आज जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एका मादी बिबट्याचा मृतदेह आढळला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिर लगत असलेल्या खुरुद वस्ती जवळील सोयाबिनच्या पिकात सहा वर्ष वयाची बिबट मादी मृत अवस्थेत आढळली आहे.
मृत अवस्थेत बिबटमादी आढळून आल्याची बतामी परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच वनपाल परदेशी, लक्ष्मण किनकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
तीन दिवसापुर्वी या बिबट मादीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी पशू वैद्यकीय अधिकारी वैभव वाकडे
यांनी बिबट्या मादीचे जागेवरच शवविच्छेदन केले. वैद्यकीय अहवालावरून मुञपिंडाच्या आजाराने या बिबट्या मादीचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved